पुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

0
307

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (१५ ऑगस्ट) : तालुक्यातील पुलखल येथे मोठ्या उत्साहाने भर पावसातही राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सावित्री गेडाम यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय तर शाळा समिती अध्यक्ष श्रीकांत सिडाम यांचे हस्ते उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी उपसरपंच रुमनबाई ठाकरे, ग्रा.प.सदस्य तुकाराम गेडाम, खुशाब ठाकरे, प्रविण कन्नाके, कविता ठाकरे, जिजाबाई आलाम, सचिव एन.डी.मोटघरे, तंटामुक्ती अध्यक्ष गिरिधर ठाकरे, ग्रामस्थ भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, शामराव चापले, आनंदराव ठाकरे, दिनकर ठाकरे, विनायक रोळे, टिकाराम राऊत, हिरामण मरस्कोल्हे, शामराव ठाकरे, तुकाराम रेचनकर, रेखा सेडमाके प्रामुख्याने उपस्थित होते.

ध्वजारोहनानंतर शाळेच्या शिक्षिका कविता बावणे, पुनम सेहगल, प्रविण घरत, संध्या नंगरे, अंगणवाडी सेविका शोभा ठाकरे यांच्या पुढाकाराने गावातून विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी प्रभात फेरी काढून स्वातंत्र्यदिन चिरायु हो! चे नारे दिले.

दरम्यान १३ तारखेपासूनच गावातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार सेवक विनोद ठाकरे, ग्रा.प.कर्मचारी सुधीर झरकर, कविता मुळे, हेमलता सेडमाके, अंगणवाडी मदतनीस रंजना ठाकरे, युवक कार्यकर्ते प्रशांत कोटगले, अनिकेत गेडाम, सुरज जराते, विशाखा रोहणकर, साक्षी जेट्टीवार, लक्ष्मी कोटगले, जिन्नत गोरडवार, स्नेहल जेट्टीवार, यामीनी सेडमाके यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here