लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १५ ऑगस्ट : जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती महाराष्ट्र भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून गोवंश खरेदी करून मालवाहू वाहनामध्ये अपुऱ्या कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता नेत असतांना
उपपोस्टे कसनसुर पोलीसांना दि. १३/०८/२०२२ रोजी खात्रीशीर गोपनीय सुत्राकडुन माहिती मिळाली की, पहाटेच्या सुमारास मौजा शेवारीहुन एक ट्रक कसनसुर मार्गे जारावंडीकडे कत्तलीकरीता जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणार आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन सदरची माहिती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. एटापल्ली यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही व नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीचे वाहन क्र. MH29T0575 या क्रमांकाचा ट्रक मिळून आला. त्यमध्ये गोवंश जातीचे लहान मोठे असे एकुन २९ गाय बैल पायांना दोरी बांधुन व कसल्याही प्रकारचा चारा पानी न घालता निर्दयतेने कोंबलेले दयनिय अवस्थेत मिळुन आले. सदर कार्यवाहीत एकुण ५,१६,०००/- रु. मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद कार्यवाहीत शैलेश मोहुर्ले, अंकित मोहुर्ले, दोन्ही रा. दिंडवी, चालक अब्दुल साजिद, रा. गडचिरोली, इरशाद कुरेशी, रा. मुर्तीजापुर अशा चार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम व मो.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही ही पोउपनि/अख्तर सय्यद (प्रभारी अधिकारी उपपोस्टे कसनसुर) परिपोउपनि/ सुशील सरनायक, सहायक फौजदार करकाडे, पोहवा/ मनिराम हर्रो, पोहवा/ वाळकृष्ण वोरघरे, नापोकॉ/ सतिश बोरकुटे, नापोकां/ देवेंद्र नंदेश्वर, पोकॉ/ धर्मादास भुसारी, पोकॉ/ संजय देशमुख, पोकॉ/ प्रमोद पाल, पोकॉ/ एकनाथ वनवे, पोकों/ देवानंद माधमवार, पोकॉ/ स्वामी मेकलवार, पोकॉ/ मुरलीधर बोरकुटे, पोकॉ / अभिनव दोडके, पोकॉ/ विकास उसेंडी, पोकॉ/ ताहा खान इ. नी केली. दयनीय अवस्थेत गाडीत कोंबल्याने कमजोर झालेल्या गुरांना मा. पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती एटापल्ली यांच्यावतीने पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. तळेकर, डॉ. दुधं व त्यांचे सहकारी यांना पाचारन केल्याने त्यांनी वेळीच गुरांवर उपचार करून मोलाचे सहकार्य केले. पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. एटापल्ली यांचे मार्गदर्शनात पोउपनि/वैभव रुपवते व पोहवा/टेंभुर्णे हे करीत आहे.