इंदिरा गांधी विद्यालय येणापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- गडचिरोली जिल्ह्यात ब्लड ची कमतरता असल्याने दिनांक १७ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर व जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था येनापुर द्वारा संचालीत जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभीयान आणि महसूल प्रशासन तहसील कार्यालय चामोर्षी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.संजय नागटिळक तहसीलदार साहेब चामोर्शी ,नवनाथ अतकारे मंडळ अधिकारी येनापुर ,अशोक वाकुडकर प्राचार्य इंदिरा गांधी महाविद्यालय येनापुर ,तसेच *प्रमुख पाहुणे*म्हणुन ,मा डॉ.शुभम कांबडे .वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येनापुर उपस्थित होते.
शिबिरात एकूण 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये मा.संजय नागटिळक तहसीलदार चामोर्शी, नवनाथ अतकारे, अशोक वाकुडकर, सुरेश गुंतीवार, अविनाश पुच्छलवार, सचिन कुरखेडे, रुपेश आञाम, सागर आत्राम, बिरबल सरकार, विनय कल्लुरवार शिक्षक येनापुर याचा समावेश होता.
डॉ.महेंद्र पेदोला वैद्यकीय अधिकारी कोणसरी,अतुल येलमुले शिक्षक , शामराव जक्कुलवार, जनहित ग्रामीण संस्थेचे सदस्य शेषराव कोहळे, ग्रामरक्तदुत जिवनदास भोयर उपसरपंच गणपूर , अमित मोरांडे अनुलोम उपविभाग प्रमुख, जिल्हा रक्तदुत रविंद्र बंडावार, संस्थेचे सदस्य रविंद्र जक्कुलवार, ग्राम रक्तदुत रामकृष्ण झाडे, ग्राम रक्तदुत आकाश बंडावार, आयुष्य दुधे व यांचे सहकार्य लाभले.