आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी

0
305

विविध मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री यांना जिल्ह्याची जाणीव असल्याचे सभागृहाचे वेधले लक्ष

लोकवृत्त न्यूज
अहेरी दि 23 ऑगस्ट :- राज्य विधिमंडळाचे मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी पुरवणी मागणीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हाला भरिव निधी उपलब्ध करून द्या अशी तीव्र व एकमुखी मागणी सोमवार 22 ऑगस्ट रोजी केली.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असून मागासला आहे. त्यातच शेतीशिवाय दुसरे उद्योग नसून यंदाच्या अतिवृष्टि व पुर परिस्थितिमुळे प्रामुख्याने शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी व पुरपीडित कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाल्याने तात्काळ नुकसान भरपाई व खास करून गडचिरोली जिल्हासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
पुढे आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत यंदा पावसाने कहर केला असून आळीपाळीने पाच-पाच दिवस घरे, रस्ते, शेती, पुल पाण्यात होते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील परिस्थितिची जाणीव असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच पुरवणी मागणीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचेही लक्ष वेधले असून नव्याने जिल्ह्यात आश्रमशाळा व वस्तिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यादानाचे सोयी-सवलत्या उपलब्ध करून देण्याचेही मागणी करून अन्य विविध मागण्या पुरवणी मागणीतुन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पावसाळी अधिवेशनात लावून धरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here