– प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांचा न्यायनिर्वाळा
लोकवृत्त न्युज
गडचिरोली, २४ ऑगस्ट : जिल्हयात दारूबंदी असतांना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांनी ३ वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश सोहन मडावी (३०), सौ. फुलबत्ती गणेश मडावी (२५) दोघेही रा. मोहडोंगरी ता.जि.गडचिरोली असे आरोपीतांचे नाव आहे.
आरोपींनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस स्टेशन गडचिरोली येथील सफौ अशोक कुमरे व सहकर्मचारी यांनी पंचासमक्ष घराची झडती घेतली असता २० लिटर हातभट्टी मोहा दारू किंमत ४००० रूपये असा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष पंचनामा तयार करून आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा मुबारक शेख पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी करून आरोपींविरूध्द पुरावा जमा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. आज २४ ऑगस्ट रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी.पी.रघुवंशी यांनी आरोपींना दोषी धरून कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ८४ महाराष्ट्र दारूबंदी कायदा मध्ये प्रत्येकी ३ वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडावी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने कारावास शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता राजकुमार उंदीरवाडे तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोहवा यशवंत मलगाम व कोर्ट मोहरर पोशी हेमराज बोधनकर यांनी कामकाज पाहिले.