गडचिरोली पोलीस दलास 3 जहाल नक्षलींना अटक करण्यात यश

0
583

शासनाने जाहीर केले होते एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २८ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्यात उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मोजा कोयार जंगल परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना ०२ जहाल नक्षलवाद्यांना अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील मीजा झारेचाडा जंगल परीसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना ०१ जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
सदर नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आले

अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये

१) रमेश पल्लो वय-२९ वर्ष रा. कोवार ता. भामरागड जिल्हा.गडचिरोली
२) तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी वय २३ वर्ष रा. पर ता. भामरागड जि. गडचिरोली
३) अर्जुन ऊर्फ महेश रेनू नरोटे वय २७ वर्ष रा.झारेवाडा ता. एटापल्ली जिल्हा. गडचिरोली याचा समावेश आहे.
अटक सदस्यांबाबत माहीती

रमेश सायबी पल्लो
दलममधील कार्यकाळ व कार्यकाळात केलेले गुन्हे            सन २०१९ मध्ये भरती होवुन कंपनी १० चा अंक्शन टिम मेंबर व स्काऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता. सन २०२१-२२ मध्ये तो स्काऊट टिम मॅचर म्हणून कार्यरत होता. त्याचा ०३ खुन, ०८ चकमक, ०१ जाळपोळ, ०९ इतर अशा एकूण १३ गुन्ह्यामध्ये समावेश आहे.  महाराष्ट्र शासनाने ४ लाख रुपये, बक्षीस जाहीर केले होते

तानी ऊर्फ शशी चमरु पंगाटी 
दलममधील कार्यकाळ व कार्यकाळात केलेले गुन्हे.          सन जुलै २०१५ मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली. सन २०१६ ते २०१९ पर्यंत ती प्लाटुन क्र ७ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. सन २०१९ ते आतापर्यंत ती कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती तिचा ०४ खुन व ९३ चकमक अशा एकुण ०७ गुन्ह्यामध्ये समावेश आहे महाराष्ट्र शासनाने ४ लाख रुपये, बक्षीस जाहीर केले होते

अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे 
दलममधील कार्यकाळ व कार्यकाळात केलेले गुन्हे
सन २०१० साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन २०१३ पर्यंत कार्यरत होता. सन २०१३ पासून प्लॉटन क्र. १४ मध्ये कार्यरत होता. ऑगस्ट २०१३ मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. मे २०१८ पासून ते आजपर्यंत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याचा ७ खुन ९ चकमक, २ जाळपोळ, २ दरोडा, ०१ जबरी चोरी व इतर ०३ अशा एकूण २४ गुन्हयामध्ये समावेश आहे  महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपये, बक्षीस जाहीर केले होते गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०२१-२२ या दोन वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत एकूण ५७ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडली. मा. पोलीस अधीक्षक  अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांचर अंकश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक चाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहए

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here