वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे प्रतिपादन
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 29 ऑगस्ट :- गडचिरोली शहरवासियांच्या असणा-या मुलभूत गरजा स्वातंत्र्याच्या पंचात्तरव्या अमृत महोत्सवानंतरही अजूनही जसेच्या तशा आहेत, गडचिरोली शहराची जी दुरावस्था झालेली आहे त्याला जबाबदार प्रस्थापीत राजकिय पक्षाचे उदासीन धोरण जबाबदार आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले.
https://fb.watch/fbUMWQ85Hc/
गडचिरोली शहर विकासाचा पंचनामा थेट जनतेशी संवाद या समारोपीय कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे होते, तर विशेष अतिथी म्हणून प्रदेश सदस्य कुशल मेश्राम , पूर्व विदर्भ मुख्य समन्वयक डॉ रमेशकुमार गजबे, पूर्व विदर्भ संयोजक राजू लोखंडे, संयोजक मुरलिधर मेश्राम, महिला आघाडीच्या गडचिरोली निरीक्षक तनुजा रायपूरे, वर्धा जिल्हा प्रभारी बंडू नगराळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ठाकूर म्हणाल्या की,गडचिरोली शहरवासियांसाठी शासनाकडून नगरोत्थान योजना , राज्येत्तर योजना , नाविण्यपूर्ण योजना , दलित वस्ती सुधार योजना, दलितोत्तर योजना, आदि योजनासाठी निधी मिळतो परंतु सत्ताधा-यांच्या नियोजन शुन्य कारभारामूळे सर्व योजनाची वाट लावली जाते, कोणतिही योजना व्यवस्थित राबविण्या ऐवजी त्या योजनेतून मला कसा वाटा मिळेल ह्याकडे सत्ताधारी वर्गाचा कल असल्याने ख-या अर्थाने गरजू लोकांपर्यंत त्या पोहचत नाही त्यामूळे नगर परिषदेच्या स्थापनेला चाळीस वर्ष होऊनही शहराची दैयनिय अवस्था प्रस्थापित असलेल्या कॉंग्रेस , राष्ट्रवादी, भाजपा , सेनेला दूर करता आली नाही अशी सडकून टिका त्यांनी यावेळी केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बाळू टेंभुर्णे यांनी शहरातील रस्ते, नाली , विद्युत, पिण्याचे शुद्ध पाणी, फुटपाथ धारकांची समस्या, नगर परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा, शहरातील आरोग्याची समस्या, ओपन स्पेसच्या सौंदर्यीकरणाची समस्या, आदिवासी समाजाचे प्रतिक असलेल्या गोटूलवर नगर परिषदेने केलेले अतिक्रमणाची समस्या,घरकुलाची समस्या, अतिक्रमणाची समस्या, पावसाळ्यातील पाण्याच्या नियोजनाची समस्या, सांडपाणी व तलावातील आगाऊ झालेले पाणी वाहून नेणारे मोठे नाले गायब झाल्याची समस्या, वाढीव घरटॅक्सची समस्या, गटार लाईनच्या कामाची समस्या, कचरा गाडी करीता लावलेल्या बार कोड प्लेटची समस्या आदि संदर्भाने गेले सात दिवस शहरातल्या वेगवेगळ्या भागात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व समस्याची चिरफाड करून पंचनाम्याचा लेखाजोखा मांडला. उपस्थित असलेले सर्वजीत बनसोडे, डॉ रमेशकुमार गजबे , कुशल मेश्राम, बंडू नगराळे, तनुजा रायपूरे, आदिंची समायोजीत भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी यांनी तर संचालन जी के बारसिंगे यांनी व आभार जॉनी सोमनकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भोजराज रामटेके, तुळशिराम हजारे, विश्वनाथ बोदलकर, मनोहर कुळमेथे, भारत रायपूरे, सोनलदिप देवतळे, मनिषा वानखेडे, वर्षा हलदर, मंगलदास चापले , धर्मेंद्र गोवर्धन , प्रज्ञा निमगडे, मंजुषा थेरकर, भैय्याजी आत्राम, भैय्याजी कालवा , निखील वाकडे, संदिप सहारे आदिनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.