– गडचिरोलीतही पडसाद
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे.
LIAFI 1964, LIAFI 2924 ऑल इंडिया LIAFI आणि CLIA वेल्फेअर असोसिएशन या सारख्या चार वेगवेगळया नोंदणिकृत लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे संयुक्त कृती समिती म्हणून स्थापन केली आहे.JAC-LIAFI ने पॉलरीधारक तसेच जीवन विमा एजंट यांच्याशी संबंधित मागण्याचे चार्टर व्यवस्थापनाकडे सादर केले आहे. या विनंतीला प्रतिसाद म्हणून व्यवस्थापनाने JAC च्या प्रतिनिधींना २९ जुलै २०२२ रोजी केंद्रीय कार्यालय मुंबई येथे झालेल्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. परंतु दुर्देवाने मागण्याच्या चार्टरमध्ये समाविष्ट केलेल्या आमच्या खऱ्या मागण्यांना व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही त्यानंतर संयुक्त कृती समितीने शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि १ सप्टेंबर २०२२ पासुन सुरु होणाऱ्या आंदोलनात्मक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विविध विभागीय परिषदांच्या सर्व एजंट संघटनांना निर्देश दिले . JAC LIAFI कडून मिळालेल्या निर्देशानुसार वाजवी मागण्या पुर्ण करण्यासाठी १ सप्टेंबर २०२२ पासून शाखेत आंदोलनात सहभागी होऊन. एजंट समुदाय आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हितासाठी आमच्या खऱ्या मागण्यांचा विचार करण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला सहकार्य करावे आणि शिफारीश करावी अशी मागणी लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.
आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन
– गडचिरोलीतही पडसाद pic.twitter.com/4vnMemi1RS— Lokvrutt News (@lokvruttnews) September 1, 2022