गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

0
240

 

लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 2 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने आज दि. ०२/०९/२०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवतीकरीता गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन नाशिक व मेहमुदा शिक्षण तथा महिला ग्रामिण विकास बहुउद्देशिय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पाडण्यात आला.

या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील २०० बेरोजगार युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते, यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन नाशिक यांचे मार्फत ६० नर्सिंग असिस्टेंट महिला उमेदवारांची व मेहमुदा शिक्षण व महिला ग्रामिण विकास बहुउद्देशिय संस्था नागपुर यांचे मार्फत ६० नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. असे एकूण १२० नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले, तसेच गडचिरोली पोलीस दल व प्रकल्प कार्यालय, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील २८ आदिवासी युवतींना दिनांक २२/०८/२०२२ ते ०१/०९/२०२२ रोजीपर्यंत ११ दिवसाचे आत्मसुरक्षा संबंधीत कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाधीना ट्रकसुट व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. यावेळी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा च मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचचाचे, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सदर महारोजगार मेळाव्याचे कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान). सोमय मुंडे सा., मा.संदीप कराडे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली, मा. ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषतज्ञ कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली, मा. तुषार मेश्राम, प्रोजेक्ट हेड, मेहमुदा शिक्षण तथा महिला ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, नागपूर, मा. आशिष इंगळे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, नाशिक, श्रीमती भारती प्रजापती, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, नाशिक हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्ट व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here