बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली तर्फे संविधान परिषद उद्या

301

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली( Gadchiroil ) दि.10 सप्टेंबर : “स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर संविधानाच्या माध्यमातून मागासवर्गीयांना मिळेल राजकीय आरक्षण यशस्वी की अयशस्वी? आरक्षणाचा लाभ घेऊन संसदेत जाणाऱ्या सदस्यांचा फायदा त्या प्रवर्गासाठी आजवर कितपत झाला? या विषयाला वाचा फोडून त्यावर विचार मंथन व्हावे” करीता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली शाखेच्या वतीने सुमानंद सभागृहात रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी “संविधान परिषद” आयोजित करण्यात आलेली आहे.

आजादी का अमृत महोत्सव तथा छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष निमित्ताने परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला अध्यक्ष म्हणुन BRSP चे संस्थापक अध्यक्ष, संविधान तज्ज्ञ डॉ. सुरेश माने उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विषयावर भूमिका मांडण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आमदार देवराव होळी यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी आमदार नामदेव उसेंडी, शिवसेना सहसम्पर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मा. रोहिदास राऊत, शेकाप सरचिटणीस भाई रामदास जराते, काँग्रेस डॉक्टर आघाडी प्रदेश सचिव प्रमोद साळवे, सामाजिक विचारवंत एस. एन. पठाण अशा विविध पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या भावनेशी जुळलेला हा प्रश्न असल्याने मोठा संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी करण्याचे आवाहन BRSP प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, प्रदेशासचिव डॉ. कैलास नगराळे, प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले आहे.