महिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार

0
508

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (Gadchiroil) दि. 14 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ‘द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष’ म्हणून डीईआईसी (DISTRICT EARLY INTERVENTION CENTRE) जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून या DEIC मध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील 4D’s नुसार आढळलेले बालके व विध्यार्थी यांना संदर्भित केले जाते..
यामध्ये आरबीएसके पथकांकडून अंगणवाडी, शाळा,आश्रमशाळा तपासणीतील तसेच SNCU,NRC,PNCward, Pediatric ward, आणि तालुकास्तरावरून PHC,Asha, RH,SDH ई. बालके/विध्यार्थी यांना DEIC येथे नोंदणी व निदान निश्चिती करून गरजेप्रमाणे डीईआईसी तील उपलब्ध थेरेपी व आवश्यकतेनुसार शाश्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित केले जातात…
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विभागातील ‘4 डी’ च्या बालकांसोबत जागतिक फिजीओथेरपी दिन साजरा करण्यात आला. डीईआयसी विभागामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील ‘4 डी’ बालकांवर उपचार केले जातात. यामध्ये विकासात्मक वाढीतील दोष (डेव्हलपमेंटल डीले), जन्मत: असणारे व्यंग (डिफेक्ट्स ॲट बर्थ), बालपणातील व त्यानंतर असलेले आजार (डिसीजेस) आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार (डिफीशिएन्सी) यांचा समावेश होतो. आधुनिक काळात फिजीओथेरपी अत्यंत प्रभावी चिकित्सापध्दती आहे. मनुष्याला क्रियाशील व आनंददायी जीवन जगण्याकरीता फिजीओथेरपी आवश्यक आहे. ‘4 डी’ च्या जास्तीत जास्त बालकांनी डीईआयसी विभागातील सेवांचा लाभ घेऊन सदृढ व्हावे. त्यासाठी पालकांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
RBSK-DEIC तर्फे दि. 10/09/2022 रोजी डॉ. अनिल रुडे मा. जिल्हा शल्य चिकित्सक तसेच डॉ. माधुरी किलनाके मा. वैद्यकीय अधिक्षका , जिल्हा महिला बाल रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली डीईआईसी येथे ‘डोळ्याचे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले….. तपासणी करीता सुरज नेत्रालय नागपूर येथील तज्ञ डा प्रभात नांगिया व चमू उपस्थित झाले…


यामध्ये शिबीरा दरम्यान Surgical 85, Higher Evaluation 27,Non surgical 15 असे एकूण 127 बालके/विध्यार्थी यांची तपासणी करण्यात आली. या बालकांना मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार शश्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भसेवा देण्याकरिता डीईआईसी तर्फे नियोजन होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here