गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022 तात्पुरती निवड यादी जाहीर

0
972

 

लेखी चाचणी (पेपर क्रमांक 1 ) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.22 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती 2022
-:  उमेदवारांकरीता महत्वाची सुचना  :–

दिनाक 19.06.2022 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती मिळालेल्या 136 पदाकरीता लेखी परिक्षा घेण्यात आली होती. 2022 करीता मान्यता

दिनांक 12.07.2022 रोजी शारिरिक चाचणीकरीता पात्र 1436 उमेदवाराची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याआधारे दिनांक 08.09.2022 ते 08.09.2022 या तारखेला गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022 मधील शारिरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराची मैदानी चाचणी घेण्यात आली.

त्यावेळी उमेदवारांचे शैक्षणीक कागदपत्रे, एनसीसी कागदपत्रे व इतर कागदपत्राची तपासणी तसेच शारिरिक मोजमाप करण्यात आले होते त्याआधारे मैदानी चाचणी मध्ये सहभागी झालेल्या उमेदवाराचे गुण दिनांक 15.09.2022 रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.

सदरची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ही लेखी चाचणी (पेपर क्रमांक 1 ) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. याकरीता साप्रवि शा.नि.के.एसआरव्ही 1012/प्र.क्र.16/12/16-अ दि. 13.08.2014 व साप्रवि शासन शुध्दीपत्रक कमांक सकिर्ण-1118/प्र.क39/16–अ दि.19.12.2018 तसेच गृह विभाग शा.नि.क. पोलीस- 1819/प्र.क्र.316 / पोल 5 अ दि.10.12.2020 या शासन निर्णयाच्या आधारावर काढण्यात आलेली आहे.

सदरची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली याचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत https://www.gadchirolipolice.gov.in/files/Result/9.pdf प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या निवड यादी व प्रतिक्षा यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 24.09.2022 18.00 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्ट / पोगर्क / पोलीस मुख्यालय येथे व्यक्तीगत आक्षेप नौद शकतात. दिनांक 24.09.2022 में 18.00 वा.नंतर प्राप्त होणा-या आक्षेपांची नोंद घेण्यात येणार

नाही उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमीषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था जामिष किंवा प्रलोभन देत असेल तर गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोगके पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here