बोदली येथे विविध दाखल्यांचे वितरण

0
201

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 24 सप्टेंबर:- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 20222 या कालावधीत राबविला जात आहे. याअंतर्गत बोदली येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शासनाने प्रलंबित दाखले व प्रमाणपत्र वितरण तसेच नागरिकांसाठी आवश्यक असलेले दाखले वितरीत करण्यासंदर्भात वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच आकाश निकोडे, यांच्या हस्ते दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपसरपंच सौ. मनिषा नितीन कुनघाडकर, सदस्य. राकेश चौधरी, सदस्य. विठ्ठल पिपरे, ग्रामविकास अधिकारी डि.एच.नैताम व लाभार्थी हजर होते मोहिम सुरू केली आहे नागरिकांनी दाखले व प्रमानपत्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच आकाश निकोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here