जिल्हयात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरणाची गरज – जिल्हाधिकारी, मीणा

0
322

गुंतवणूक प्रोत्साहन, निर्यात, व्यवसायातील सुलभता व एक जिल्हा एक उत्पादनावर जिल्हास्तरीय परिषदेचे आयोजन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 11 ऑक्टोबर : अनेक प्रकारची आव्हाणे, येथील भौगोलीक परिस्थिती यांचा विचार करून जिल्हयात असलेल्या मुबलक वनोपजावर तसेच धान उत्पादनावर अधारीत उद्योग उभे करण्यासाठी गुंतवणूकदारांना आवश्यक पोषक वातावरणाची गरज आहे असे मत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गुंतवणूक प्रोत्साहन, निर्यात, व्यवसातील सुलभता व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावरील जिल्हास्तरीय परिषदेत व्यक्त केले. जिल्हा औद्योगिक केंद्र गडचिरोली यांच्या मार्फत गडचिरोली येथे जिल्हयातील व आजूबाजूच्या गुंतवणुकदारांसाठी एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मीणा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्हयातील पैसा जिल्हयातच फिरत आहे, बाहेरून जिल्हयात गुंतवणूक झाल्यास जिल्हयाचे उत्पन्न वाढेल. जिल्हयात धानाबरोबर 84 वेगवेगळी उत्पादने आहेत. यावरील उद्योग मोठ्या प्रमाणात जिल्हयातच उभे राहू शकतात. गडचिरोली जिल्हयात तीन औद्योगिक क्षेत्र आहेत. याठिकाणी गुंतवणूकदारांना येण्यासाठी प्रशासनासह व इतर क्षेत्रातील व्यक्तिंनी सहकार्य करून पोषक वातावरण देणे आवश्यक आहे. या परिषदेत उपवनसंरक्षक मिलेश शर्मा, डी जी महाजन नोडल अधिकारी मैत्री कक्ष मुंबई, स्वप्निल राठोड महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, अतुल पवार, व्यवस्थापक, अतुल हुरकत, सीए, युवराज टेंभुर्णे व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वप्निल राठोड यांनी जिल्हयातील गुंतवणूक व संधी याबाबत प्रास्तावनेत माहिती उपस्थितांना दिली. तसेच निलेश शर्मा यांनी वन विभाग व त्याअंतर्गत असणाऱ्या विविध वनोपजांवरील उत्पादन क्षमता व सद्यस्थितीबाबतची माहिती सादर केली. गडचिरोली जिल्हयातील एक जिल्हा एक उत्पादनासाठी धान या उत्पादनाची निवड करण्यात आली आहे. प्रमुख उत्पादन असलेल्या धानाची निर्यात कशी प्रत्यक्ष करता येईल यासाठीही या परिषदेत विचारमंथन करण्यात आले. अतुल हुरकत यांनी यावेळी निर्यातवृद्धी यावर माहिती दिली. सिडबी नागपूर येथील श्री.मोरे व श्रीमती प्रियांका यांनी सिडबी कर्ज योजनांची माहिती दिली. युवराज टेंभुर्णे व गजानन मद्यासवार यांनी बँक योजना सांगितल्या. एक जिल्हा एक उत्पादन यावर बसवराज मस्तोळी यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here