सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन

0
211

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,11 ऑक्टोबर : सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मनोविकृती विभाग जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या वतीने जागतीक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहाचे आयेाजन करुन उद्घाटनपर कार्यक्रम दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी पार पाडण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य “सर्वासाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण प्राथमिकता तुमची, आमची नव्हे तर सर्वाची” ही होती. कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुढे व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियेाजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ. इंद्रजित नागदेवते भिषक सामान्य रुग्णालय, गडचिरोली, प्रमुख वक्ते डॉ. सचिन हेमके व डॉ. मनिष मेश्राम भिषक व मानसोपचार तज्ज्ञ तसेच अधिसेविका मेट्रन श्रीमती अंजु खेवले, अति.अधिसेविका व शामिणी धात्रक सिस्टर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने सन्मानियांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. सचिन हेमके यांनी मानसिक आजारा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच डॉ. मनिष मेश्राम कार्यक्रम अधिकारी यांनी मानसिक आजारा संदर्भात रुग्णांना मिळणाऱ्या सेवे संदर्भात व मानसिक कायदा 2017 संदर्भात माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. इंद्रजित नागदेवते यांनी लहान मुलामध्ये अभ्यास व ताणताणाव यांची सांगड घालुन तसेच शेतकरी, कर्मचारी यांच्यावर येणाऱ्या ताणतणाव निवारण यावर मार्गदर्शन केले. तसेच फुले आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीपर पथनाटय सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय खैरकर चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन राजेश नागपुरे समाजसेवा अधिक्षक मनोविकृती विभाग यांनी केले. या कार्यक्रमास हातभार लावणारे कर्मचारी वृंद श्रीमती किरण रघुवंशी कॅम्युनिटी नर्स, प्रियंका पिंपळे, मनोविकार परिचारिका, किशोर मोडक समाजसेवा अधिक्षक मनोज श्री. बाळासाहेब चव्हाण समाजसेवा अधीक्षक मनो, तुराब शेख अभिलेखापाल व सतिश येरेकर केस रजिस्ट्री असिस्टंट व रुग्णालयीन कर्मचारी यांनी या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी सहकार्य केले असे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here