लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 13 ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे कार्यरत असलेल्या तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे (44) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी कार्यालय बेतकाठी येथे रंगेहाथ पकडले. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदारास 10 ऑक्टोबर रोजी सोडलेल्या टिप्परचे 10 हजार रुपये व टिप्पर, ट्रक्टर ने तलाठी कार्यालय बेतकाठी या आपल्या कार्यक्षेत्रातून गिट्टी खदान माल वाहतुक करण्याच्या कामाकरिता महिना 10 हजार रुपये असे एकुण 20 हजार रुपयांची मागणी तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे यांनी केली. मात्र तक्रारदार यास सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली असता सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष सुस्पष्ट मागणी करून 15 हजार रुपयांची लाच रक्कम तलाठी कार्यालय बेतकाठी साजा क्र. 9 मध्ये स्विकारतांना तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत तलाठी तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे विरोधात पोलीसा स्टेशन कोरची येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.