१८ विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेशाचे तात्काळ वाटप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १५ ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा गोंडवाना विद्यापीठात नुकताच पार पडला .
याप्रसंगी मंचावर खासदार अशोक नेते आमदार डॉ.देवरावजी होळी, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन नागपूरचे गिरिधारी मंत्री, समन्वयक सेंट्रल प्लेसमेंट सेल गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ.अनिरुद्ध गचके , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त् योगेंद्र शेंडे, कौशल्य् विकास अधिकारी गणेश चिमनकर आदी उपस्थित होते.
येत्या दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात अनेक कंपन्या सुरू होणार आहेत. तेव्हा या भागातील विद्यार्थ्यांनी इतर कुठेही नोकरी करता जाण्याची आवश्यकता राहणार नाही. असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले
शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू झालाय. त्यामुळे अशा मेळाव्यामुळे लाखो बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.असे आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले.
सदर मेळाव्यामध्ये४८४ उमेदवार रोजगार मेळाव्या करिता उपस्थित होते व नवकिसान बायोप्लॅनटेक लिमिटेड नागपूर डिस्टिल एज्युकेशन प्रा.लि. नागपूर, मंगल फायनान्स् गडचिरोली, रुचा/बडवे इजिनिअरिंग औरंगाबाद, एसबीआय लाईफ इशुरंन्स् गडचिरोली, भारतीय जीवन विमा निगम गडचिरोली, क्वीज कॉर्प लिमिटेड पुणे, इनोव्हसोर्स नागपूर, साथ आऊटर्सोसिंग प्रा.लि. नागपूर, स्टॉप सेंटर मिशन नागपूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली ,वसंतराव नाईक विभाजन विकास महामंडळ गडचिरोली, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ गडचिरोली, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ गडचिरोली, संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ गडचिरोली,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ गडचिरोली , या कंपन्या उपस्थित होत्या .सदर कंपन्यांनी प्राथमिक निवड केलेली आहे तसेच व्यवसाय करता विविध कर्ज योजना याकरिता मार्गदर्शन देखील करण्यात आले. नवकिसान बायोप्लॅनटेक लिमिटेड नागपूर कंपनीने तात्काळ १८ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वाटप केले. तेव्हा विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसले.
यापूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सहकार्यामुळे २५ विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ऑर्डर मिळाले आहेत विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे, विद्यार्थी बेरोजगार राहू नये, त्यांचा आर्थिक स्तर वाढवा यासाठी गोंडवाना विद्यापीठाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अविरत प्रयत्नरत आहे.
कार्यक्रमाचे संचालन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. उत्तमचंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी अथक परिश्रम घेतले.