लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १५ ऑक्टोबर: गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी ‘V.LE.’ (Village Level Entrepreneur) ची एक दिवसीय कार्यशाळा दि. १५/१०/२०२२ रोजी पार पाडण्यात आली.
सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना ऑप बाबत माहिती देण्यात आली. सदर ऑपच्या माहितीमुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई श्रम कार्ड, पेंशन सर्विस इन्शुरंस या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. यावेळी माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२२ मधील VLE चे उत्कृष्ट काम करणान्या युवक- युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. तसेच कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट मॅनेजर (CSC) गडचिरोली, आकाश खोडचे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (C.S.C.) गडचिरोली, विशाल कुंभाळकर हे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.