वाहाणगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकान विरोधात चक्का जाम

0
401

आज  वहाणगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या विषयावर चक्का जाम करण्यात आला.

लोकवृत्त न्यूज
ता / प्र. चिमुर मंगेश शेंडे  22 ऑक्टोबर:- वहाणगांव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान श्रीमती मंगलाबाई गौरकार याच्या नावाने होते. कोरोना काळात त्यांनी धान्याची मोठी अफरा तफर करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्यावर गुन्हे नोंद केले व त्यांचा परवाना रद्द करून स्वस्त धान्य दुकानाचा तात्पुरता वाटप आदिवासी सहकारी संस्था मर्यादित वहाणगांव ला देण्यात आला होता.
मात्र आता त्या दुकान मालकाच बनावटी वारस सुरज रामटेके यांना कोणतीही चौकशी न करता तसेच गावकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता परवाना देण्यात स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला .
सर्व गावकरी लोकांना हे मान्य नाही. आमचा वाटप आदिवासी सहकारी संस्थेतून व्हावा या निर्णयावर ठाम आहे. सर्व ग्रामस्थांनी सहिनीशी निवेदन तहसीलदार साहेब चिमुर , DSO साहेब चंद्रपूर, मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी साहेब यांना दिले मात्र दुकानाचा परवाना सुरज रामटेके याना दिल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले.
त्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन आले व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दुरध्वनी वरून या प्रकरणाची योग्य चौकशी करून योग्य निर्णय देऊ व तोपर्यंत वाटप आदिवासी सहकारी संस्था करेल असे आश्वासन त्यांनी दिले. व नंतर आंदोलन मागे घेण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here