रविवारी सुद्धा गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशन दुकान उघडी ठेवा – नगर सेवक आशीष पिपरे

0
277

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी , 22 ऑक्टोबर :- केंद्र व राज्य सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना युद्धस्तरावर हाती घेतल्या असून या दिवाळीला गरिबांच्या मदतीला राज्य सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा ,१ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंदाचा शिधा वाटप करून दिवाळी भेट दिली या बद्दल भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी जिल्हा गडचिरोलीचे वतीने ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगर सेवक आशीष भाऊ पिपरे व सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.
यावेळी चामोर्शी येथील समस्त प्रभागातील रेशन दुकानांमध्ये जाऊन शेकडो लाभार्थी यांना स्वहस्ते आनंदाचा शिधा बॅग लाभार्थ्यांच्या हाती सोपविली.
व शहरातील अनेक शिधा लाभार्थी यांना लिंक हळूवार असल्याने तत्काळ शिधा वाटप करण्यास व्यत्यय निर्माण होत आहे त्यामुळे शिधा वाटप दुकानात लांब रांग लागली आहे यावेळी नगर सेवक आशीष भाऊ पिपरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना उद्या रविवारी सुद्धा शिधा वितरण दुकान सुरू ठेवण्याची मागणी केली
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना महायुती सरकारने राज्यातील गरिबांना दिवाळीनिमित्त १०० रुपयांमध्ये १ किलो तेल, १ किलो रवा ,१ किलो डाळ, १ किलो साखर हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. आज दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा वाटप करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी स्वतः राशन दुकानांमध्ये जाऊन तसेच प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या घरी जाऊन या आनंदाच्या शिधा बॅग चे वितरण लाभार्थ्यांना केले.
यावेळी चामोर्शी शहरातील शेकडो शिधा लाभार्थी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here