दिवाळीच्या पर्वावर कर्तव्य बजावतांना लाईनमन चा करंट लागुन मृत्यू

0
665

असा लाईनमन पुन्हा होणे नाही” नागरिकांच्या भावना.

लोकवृत्त न्यूज
पोंभूर्णा 22 ऑक्टोबर : तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी प्रकाशमय व्हावी व शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरण पोंभूर्णा चे कर्मचारी दिपक पेंदाम (वय 30) यांचा 11kv विद्युत वाहीनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक अपघात झाला आणि त्यामध्ये दिपक पेंदाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, दिपक बाळ पेंदाम रा. खेडी, ता. सावली येथील असून ते महावितरण पोंभूर्णा येथे मागील दीड वर्षापासून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेमुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत झाले होते. त्यांच्या कामाबाबत उपस्थित जनसमुदायातून “असा लाईनमन पुन्हा होणे नाही” असा एकच सुर उमटत होता. त्यामुळेच त्यांना विभागीय कार्यालय यांचेकडून “उत्कृष्ट कामगार” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले होते हे विशेष. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पुढील चौकशी पोंभूर्णा उप-पोलिस स्टेशन चे ठाणेदार धर्मेंद्र जोशी करीत आहे. सदर घटनेबाबत मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी तात्काळ महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी तसेच पत्राद्वारे संपर्क करून सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व मृतकाच्या परिवारास शासकीय नियमाप्रमाणे तात्काळ मदत देण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here