लोकवृत्त न्यूज
जि. प्र. गडचिरोली ८ नोव्हेंबर: जिल्ह्यातील खरपुंडी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिरोली – खरपुंडी मार्ग अनेक गावांना जोडतो. परीसरातील गावांतील ग्रामस्थ या मार्गाने गडचिरोली तालुका मुख्यालयात व बाजारात ये-जा करतात.खासगी वाहनांसह व अन्य वाहनांची वर्दळ दररोज असते. या मार्गावर खरपुंडी खड्डे पडून अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने या मार्गाची केवळ डागडुजी न करता नूतनीकरण करावे, अशी मागणी खरपुंडी, दिभणा,जेप्रा, अर्मिझा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले. रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.