चंद्रपूर:शिर धडावेगळे करणाऱ्या 8 आरोपींना अटक

0
466

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर 8 नोव्हेंबर : दुर्गापूर येथे महेश मेश्राम 32 वर्षीय युवकाच्या निर्घूण हत्या प्रकरणात 8 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्हा येथून अटक केली आहे.

काल सोमवारी रात्री आऊणे अकरा वाजताचे सुमारास दुर्गापूर हद्दीत ईमली बार व नायरा पेट्रोलपंप समोर दुर्गापूर रोडवर पुर्व वैमन्यस्यातून अज्ञात 7 ते 8 मारेक-यांनी महेश मेश्राम रा. दुर्गापूर या युवकाला ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असतांना त्याचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शस्त्रांनी हत्या केली होती. त्यानंतर धडापासून मुंडके निर्दयपणे वेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळुन गेले. दुर्गापूर पोलीस स्टेशनला भादंवी 302, 143, 147, 149, 427 भा. द.वी. सह कलम 4, 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनि अतुल कावळे यांचेसह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली. सदर पथकांनी अज्ञात आरोपीतांचे नांव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपी हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळुन जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्थागुशा चे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकांनी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले. मोठ्या शिताफिने आरोपी अतुल मालाजी अलीवार (वय 22) रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, दिपक नरेद्र खोब्रागडे ( वय 18) रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, सिध्दार्थ आदेश बन्सोड (वय 21) रा नेरी दुर्गापुर, संदेश सुरेश चोखान्द्रे ( वय 19) रा सम्राट अशोक वार्ड क 2 दुर्गापुर चंद्रपुर, सुरज दिलीप शहारे (वय 19) रा. समता नगर वार्ड क 6 दुर्गापुर, साहेबराव उत्तम मलिये (वय 45) रा नेरी समतानगर वार्ड क 6 दुर्गापुर, अजय नानाजी दुपारे ( वय 24) रा उर्जानगर कोंडी दूर्गापुर व प्रमोद रामलाल सुर्यवंशी (वय 42) रा उजीनगर दुर्गापुर आदी आठ संशयीत आरोपींना स्कॉर्पीओ वाहनासह अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.
सदर संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन चौकशी केली सहा आरोपींचा गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असून दोन आरोपी यांनी आपले ताब्यातील चारचाकी स्कॉर्पीओ वाहन क्र. एम. एच. 04 जिझेड 9091 नी वरिल नमुद अरोपीतास पळुन जाण्यास मदत केली. सर्व आरोपींना पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here