गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभाग व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “बचत गटांना कृषी अवजारे वाटप ” समारंभ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २५ नोव्हेंबर:-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी व गडचिरोली जिल्हयातील शेतकन्यांचे जीवनमान उंचावावे या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” थे माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल, जिल्हा नियोजन विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने मानव विकास योजना २०२१ २०२२ अंतर्गत बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ दि. २५/११/२०२२ रोजी शहीद पांडु आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला.
सदर कार्यक्रमाकरीता गड़चिरौली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील ५१ बचत गटाचे ५०० हुन अधिक लाभार्थी उपस्थित होते. यातील २७ बचत गटांना मळणी यंत्र १२ बचत गटांना झिरो दिल ड्रिल मशिन, ६ बचत गटांना मात रोवणी यंत्र, ६ बचत गटांना पाँचर चिडर या कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. तसेच मधुमक्षिकापालन व पापड लोणचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र व किट देण्यात आले. मानव विकास मिशन कार्यक्रम २०२१-२०२२ अंतर्गत रोजगार निर्मीतीकरीता ‘विशेष योजना अंतर्गत कृषी अवजारांचा लाभ मिळवून देणेकरीता साहीत्याच्या किंमतीच्या ९० टक्के तसेच ७५ टक्के सबसिडीवर साहीत्य उपलब्ध करुन देण्यात आले असून सर्व लाभाथ्र्यांना कृषी यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील शेती व्यवसाय हा पारंपारीक पध्दतीने न राहता अत्याधुनिक पध्दतीने व्हावा व कृषीमध्ये यांत्रिकीकरण व्हावे यासाठी शेतकन्यांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल प्रयत्न करीत आहे. शेतकरी, युवक-युवती, बचत गट, स्वयंसहायता गट- यांनी शासनाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. विकासाभिमुख कार्यक्रमांसाठी गडचिरोली पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने स्वतःचा व जिल्हयाचा विकास साधावा.
यावेळी मार्गदर्शन करतांना मा. संजय मिना, जिल्हाधिकार गडचिरोली यांनी सांगितले की, गडचिरोली प्रशासन या जिल्हयातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या लाभ मिळावा याकरीता प्रयत्न करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २,५७,९५५ लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची प्रसंशा केली.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत २,५७,९५५ लोकांना लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत १३५१५ शेतकऱ्यांना कृषी बियाणे वाटप १५१७ शेतकन्यांना भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळी पालन इत्यादी प्रशिक्षण व साहीत्याचे किट देवुन रोजगार व स्वयंरोजगाराकरीता आत्मनिर्भर करण्यात आले. ४२६८ शेतकऱ्यांना शेवगा, पपई, सिताफळ फळझाडे मोफत देण्यात आले. २२०८ शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन फार्म भरून दिले. १९८० शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच १७६ शेतकऱ्यांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला व ४ सहलीमधुन १६८ शेतकऱ्यांना कृषीदर्शन सहलीतून आधुनिक शेतीची माहीती मिळवून देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमप्रसंगी मा.जिल्हाधिकारी संजय मीना सा., मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक
श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा. मा. जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, मानव विकास अभियान, मा. डॉ. संदीप कहाळे कार्यक्रम समन्वय कृषी विज्ञान केंद्र सोनापूर मा.चेतन वैद्य संचालक बीओआय आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे / उपपोस्टे / पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.