आयुष्य आपलं कसं असावं,ते कसं जगायचं हा निर्णय स्वताचा असतो.. जिथे आपल्याला व्यवस्तीत वाटत असणार तिथेच आपण निर्णय घेत असतो.. आपला निर्णय हा चुकीचा असला ,किंवा एखाद्या कामात अपयश आले तर,लगेच राग येतो.आणि आपला राग हा दुसऱ्यावर काढत असतो..किंवा,पुढे चालायचं सोडून माघार घेत असतो…मग लढणार केव्हा ? लढणारच नाही तर समस्या सुटतील तरी कश्या..?
गेलेली वेळ परत येईल का.? की येणारच नाही…
व्यव्हारामध्ये आपल्या प्रामाणिक,तत्वनिष्ठ,आणि शिस्तप्रियता या गोष्टीचा अनुकरणाने स्वतः काय आहोत ,काय करू शकतो.. हे ओळखूनच स्वतःशीच स्वतः लढू शकणार….
नेहमी एकूण परत परत तेच आठवण करून द्यायला मनामद्ये थोडी खंत वाटत आहे…की, भारतभूमीचे असून आजपर्यंत शिकत आलेला इतिहास, ..ज्यामधून स्वतःला घडविण्यासाठी स्फुर्ती मिळत असते, इथेच तर ,आपण चुकतो की ,ते पार विसरूनच गेलो…
कुणी काहीही बोलले ,निंदा केली तर,त्याचा बदला कश्या प्रकारे घ्यायचा, हाच विचार करत असतो…हे तुमच्या तरी मते योग्य वाटते काय..?
मान्य आहे मला राग येतोच.परिस्तिथीशी लढण्यासाठी ,भांडण्यासाठी,
झटण्यासाठी “राग” हीच महत्वाची भूमिका असते.आणी, शरीरात राग हीच ‘ऊर्जा’ पण, निर्माण करीत असते.. पण आपला राग हा सकारात्मक आहे का..?की, जे इतिहास घडविणारे होते ..त्यांना कधी राग आलाच नसणार का..? किव्हा राग, मनामद्ये घेऊन नकारात्मक विचारांशी लढून इतिहास रचला असतील का..? नाहीच…नाहीतर, वीर शिवाजी महाराजांसारखे राजे,झाशीची राणी,सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर …हे इतिहास घडविणारे भारत भूमीचे नसतेच!
रागातून तयार होणाऱ्या उर्जेला सकारात्मक विचारांनी लढून ,स्वतःला घडवून, इतिहास रचिला…
ज्या गोष्टीच महत्व नाहीच अश्या, बिनफालतू गोष्टीवर रागावून आपला वेळ वाया घालविण्यापेक्षा रागामधूनच होणाऱ्या द्वेषाचे रूपांतर सकारात्मक इच्छाशक्ती मद्ये करायला पाहिजे..म्हणजे ,बदला घेण्याची भावना मनामद्ये न ठेवता, समोर येणाऱ्या प्रत्येक “नकारात्मक “अडचणीवर मनातील सकारात्मक इच्छेने, लढाल तर ,नक्कीच यश मिळणार..आणि, स्वतःचा स्वतःशी असलेला लढा हा सहज प्रेमाने जिंकणार…
खुपदा अस होत असते की,आपली चूक नसताना ,कुणी दुखविले ,अपमानित केले, फसविले की, मनाला त्रास होतोच…पण स्वतःला त्रास करून उलट स्वतःचीस मानसिकता बिघडत असते,..ज्या गोष्टीमुळे त्रास होत असणार, त्यावर विचार करून काही मिळतंय का..? नाही ना ?यामद्ये तर ,आपलाच वेळ वाया जात असतो ..मग हा आपला मूर्खपणा नाही असणार का..?
माझं अस मत नाही किव्हा,मी अस बोलत नाही की, तुम्ही विचार नका करू…करा …पण,त्यामधून तुम्ही काय शिकले,अनुभव काय घेतले ..घेत आलेत, या घेणार हे सगळं आयुष्यभर लक्ष्यात ठेवा..म्हणजे, त्यामधूनच ,लढण्याची भांडण्याची ,झटण्याची , इच्छाशक्तीसाठी शरीराला लागणारी ” सकारात्मक “उर्जा ही मिळत असते…
स्वतःचे मार्ग हे स्वतःलाच शोधावे लागतात, संकट काळात ,मदतीच्या वेळेला,सांभाळून घेण्यासाठी कुणाला हाक दिली तर ,जवळ कुणीच येणार नाहीत…लक्षात ठेवायचं “अंधारामद्ये स्वतःची सावली सुद्धा साथ सोडत असते”तर,कुणावर विश्वास करणार.?..जीवणाचंही तसंच असते, आयुष्याची लढाई ही एकट्यालाच लढावी लागते .. जर चांगल्या विचारांनी लढाई केली ..तर नक्कीच “स्वतःशी असलेला लढा” हा पूर्ण करून यशस्वी होणार,आणी आयुष्य ही आनंदमय होणार…..
✍️ प्रियंका वाकडे /शेंडे
गडचिरोली