दिभना: गावातील अवैध दारू विक्री बंद करा

527

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणित गिल्डा यांच्याकडे मागणी

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली ६ डिसेंबर: गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत दिभना गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील या गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण पिढी वाईट व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारू बंदी व्हावी यासाठी सदर दारू विक्रेत्यांना गाव संघटना व ग्रामपंचायत समिती तर्फे वारवार सुचना दिली आहे मात्र तरीही दारू विक्री सुरूच आहे. कृपया त्वरित कार्यवाही करण्यात यावी व गावातील कायदा व शांतता टिकवण्यासाठी मदत करावी.
दारुबंदी अध्यक्ष सिंधुताई प्रकाश नैताम, दारुबंदी उपाध्यक्ष मैनाबाई रेमाजी लेनगुरे, दारुबंदी सदस्य लताबाई उइके, दारुबंदी सदस्य सकुंतला नैताम, ग्रा.प.सरपंच रमेश नक्तूजी गुरनुले, ग्रा.प.उपसरपंच उषा नरेश चौधरी, ग्रा. प.सदस्य धनराज जेंगठे,ग्रा. प.सदस्य राजू जेंगठे,ग्रा. प.सदस्य ज्योति जेंगठे ,ग्रा. प.सदस्य ज्योति नैताम, शा.व्य.स.अध्यक्ष विलास जेंगठे, त.मु.अध्यक्ष शंकर वाटगुरे, त.मु.उपाध्यक्ष बालाजी पा. जेंगठे, त.मु.सदश्य रामा शेंडे त.मु.सदश्य रविन्द्र मांदाडे, त.मु.सदश्य शोभा नैताम, बचत गट अध्यक्ष वैशाली गणेश जेंगठे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर जेंगठे, शा. व्य. समितीचे सर्व सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते

ग्रामपंचायत मीटिंग घेण्यात आली यानंतर दिनांक ५ डिसेंबर सोमवार
उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्याकडे निवेदन देण्यात आले त्या सोबत दारु विक्री करणाऱ्याचे नाव देण्यात आले व आमच्या गावातील दारू पूर्णपणे बंद करून द्यावे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे