गडचिरोली व्याहाळ मार्गावर अवघ्या 1 तासांत 2 भिषण अपघात

668

१ मुत्य तर ७ जखमी

Lokवृत्त न्यूज
चंद्रपूर १६ डिसेंबर : गडचिरोली – चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील व्याहाड बुज येथे सायंकाळच्या दरम्यान नंदिनी बार जवळ MH 34 BY 6141 दुचाकीची उभ्या  MH 35 G7665 ट्रॅक्टर ला जबर धडक झाली यात दुचाकी चालक जागीच ठार झाला व अवघ्या एका तासात MH 21 AH 7717 स्कार्पिओ ने धडक दिली यात सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १६ डिसेंबर रोजी शुक्रवार सायंकाळच्या सुमारात घडली आहे

दुचाकी चालकाचे नाव खुशाल वासेकर (३२) असे असून हा जागीच मृत्यू झाला व्याहाड बुज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
व स्कार्पिओ मधील ७ जण गंभीर जखमी झाले आहे
ती नादुरुस्त ट्रॅक्टर त्या जागेवर हटणार का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. पुढील तपास सावली पोलीस करत आहेत