पत्रकारांनी एकजुटीने कार्य करावे : प्रा. महेश पानसे

0
137

– गडचिरोली येथे डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : ६ जनवरी हा दिवस मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ग्रामसेवक भवन धानोरा रोड गडचिरोली द गडविश्व व लोकवृत्त न्यूज यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली
समाज प्रबोधनासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दर्पण या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची आदर्श आजच्या तरुण पत्रकारांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. महेश पानसे विदर्भ प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी आज द ,गडविश्व व लोकवृत्त न्यूज यांच्या माध्यमातून आयोजित डिजिटल मीडियात कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा तथा पत्रकार दिनी बोलताना केले‌.

गडचिरोली येथे डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा
गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोविडमुळे त्रस्त होते. मात्र या संकटकाळात देखील प्रिंट मीडिया पूर्णतः बंद झालेले होते त्यावेळेस डिजिटल मीडिया चे संपादक व त्यांच्य वार्ताहरांनी पत्रकारिते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अन्नछत्रा पासून ते धान्य किट व प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले, असे तुळशीरामजी जांभुळकर आज कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोली येथे काढले.

जेष्ठ पत्रकार रोहिदासजी राऊत यांनी आयोजीत कार्यक्रमाचे कौतुक केले व नक्कीच अशाप्रकारचा कार्यक्रम होणे आवश्यक आहे. डिजीटल मिडीया हा झटपट काही क्षणात बातमी लोकांपर्यत पोहचविण्याचे काम करीत आहे अशातच पहिल्यांदाच असा कार्यक्रम डिजीटल मिडीयाचा पत्रकारांनी आयोजीक करून डिजीटल मिडीयामध्ये कार्यरत पत्रकारांना एकत्रिक आणण्याचा प्रयत्न करण्यात आला याचे कौतुक केले.

रूपराजजी वाकोडे यांनी सुध्दा आयोजीत कार्यक्रमाची प्रशंसा करीत अशाप्रकाराचे कार्यक्रम डिजीटल मिडीयातील पत्रकारांनी एकत्रीतपणे काम करून करावे त्यामुळे संघटन मजबूत होईल असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातून केले.

याप्रसंगी जितेंद्र चोरडिया यांनी सुद्धा , कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकार बांधव आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्यात कुठेही कमी पडले नाहीत, याचा मला अभिमान आहे.

डिजिटल मीडियामध्ये कोणीही कापी-पेस्ट न करता स्वतःच्या मनोवृत्तीने वृत्त लिहिल्यास एक वेगळी छाप पडून क्रांती घडवून आणण्याचे मानस चांदा ब्लास्ट चे उपसंपादक आशिष रैच यांनी पत्रकारांना संबोधित करताना व्यक्त केला

यावेळी मान्यवरांनाच्या हस्ते सहभाग दर्शविल्याबद्दल शील्ड मार्गदर्शनावर शील देण्यात आले
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पूर्व प्रांताध्यक्ष प्रा. महेश पानसे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक भास्कर चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी रुपराजजी वाकोडे, जेष्ठ पत्रकार तथा D वाईस न्यूज पोर्टलचे संपादक रोहिदासजी राऊत, माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तुळशीरामजी जांभुळकर, डिजिटल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, चांदा ब्लास्ट उपसंपादक आशिष रैच, खरे वृत्तांत न्यूज पोर्टल संपादक मोरेश्वर उद्योजवार, एस.के. २४ तास न्यूज संपादक सुरेश कन्नमवार तर सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र मत न्यूज २४ तास पोर्टल चे संपादक खोमदेवजी तुम्मेवार यावेळी डिजीटल मिडीयात कार्यरत असलेले संपादक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे यांनी तर आभार लोकवृत्त न्यूज चे संपादक निलेश सातपुते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here