लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १९ फेब्रुवारी : दरवर्षी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी गडचिरोली शहरात भूमि एम्पायर परिवारातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जाणती सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रेलचेल
सकाळी ०८.०० वाजता : छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती स्थापना व पूजा आरती
सकाळी ०९. ०० वाजता : भव्य पालखी शोभा यात्रा
भव्य पालखी शोभा यात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान शिवनेरी वरून आणले माती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक स्थान रायगड वरचे पाणी, रायगड वर नेवून पावन केलेल्या पादुका व पंचधातूची महाराज मूर्ती ची भव्य पैदल शोभायात्रा असणार आहे.
सकाळी ११.०० वाजता : सार्वजनिक महाप्रसाद (मसाला भात) वितरण
दुपारी १२.०० वाजता : रक्तदान शिबीर आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उदघाटन
दुपारी ०४.०० वाजता : सांस्कृतिक कार्यक्रम
सायं ०५. ०० वाजता : विशेष आकर्षण – महाराष्ट्रयीन लोककला हलगी वादन
सायं ०७. ०० वाजता : सुरज वनकर यांचे ‘उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान
रात्रो ०९. ०० वाजता : सहभोजन व कार्यक्रमाची सांगता
हे असतील विशेष आकर्षण
महाराष्ट्रयीन लोककला हलगी वादन
शोभायात्रेचे विशेष आकर्षण
१०० च्या वर महिलांचे भव्य लेझीम पथक
१५ च्या वर पुरुषांचे महाराष्ट्रीयन लोककलेचे प्रतीक हलगी वादन
६० च्या वर पुरुषांचे झाडीपट्टी लोककलेचे प्रतीक वीजघंटा भजन
१२ ते १५ लोकांचा संच जे शोभायात्रेत महाराजांचा राज्यभिषेक सादर करणार