लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २१ फेब्रुवारी : टीसीओसी कालावधीत नक्षल्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस दलाकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त केल्या.
नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी जंगलात लपवून ठेवेलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत ०१ सिंगल बॅरल १२ बोअर रायफल व ०१ एसएसआर रायफलचा समावेश आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि. धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले.