रेती तस्करांना पाठबळ कोणाचे?
लोकवृत्त न्यूज
सावली दि. २३ फेब्रुवारी:- शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा घटक म्हणून गौण खनिजाकडे बघितल्या जाते नदी नाल्यातील रेती हे घटक त्या पैकी एक आहे सावली तालुक्यात बहुतांशी रेती घाटांचे लीला प्रक्रिया रढकल्याने त्यातील तालुक्यातील समदा रेती घाट लिलाव झाला व शासनाला या घाटापासून महसूल सुद्धा मिळाला
सध्या स्थितीत सुरू असलेल्या रेती घाट मालकाला एक रुपयाही न देता रेती तस्करांनी रेती घाट मालकांना जुमानता अवैद्यपणे रेती घाटाची निर्मिती करून शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसुलाचे हरण केलेले आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेची साथ रेती तस्करांना लाभत असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील रेती तस्करी महसूल यंत्रणेच्या हाताबाहेर गेलेली आहे
सावली तालुक्यात सामदा हा एकमेव रेती सुरू असून बाकी रेती घाटांची लीलाव प्रक्रिया रडखळलेली आहे त्यामुळे तालुक्यात रेती तस्करी करिता अवैध निर्माण केलेल्या घाटातून रेतीचा उपसा रोजरासपणे सुरू आहे त्यासाठी कुठे छुपे पाठबळ तर कुठे महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन काम फत्ते केले जात आहे व वैद्य घाट मालक रोज रासपणे होणारी तस्करी मूकनायक बणून बघत आहे महसूल यंत्रणा कुठे प्रामाणिक तर कुठे देखाव्यासाठी कारवाईचा बगुलबुवा करताना चे दिसून येत आहे तालुक्यामध्ये रेती तस्करांची प्रचंड दहशत आहे व यावर राजकीय व्यक्तीचे नियंत्रण असून या राजकीय व्यक्तीच्या इशाऱ्यावर तलाठ्यावर ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत मजल यापूर्वी रेती तस्करांनी मारली असल्याची लोकचर्चा या परिसरात जोमाने सुरू आहे
तालुक्यातील काही रेती घाटामध्ये तस्करांच्या सातत्य रेती उपसा मुळे रेतीच शिल्लक नसून आता माती दिसू लागली आहे तरीसुद्धा रेतीची तस्करी सुरूच आहे ही रेती सर्व जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यात तस्करी होत असून त्यातून दर दिवशी लाखो रुपयाची उलाढाल होत असल्यामुळे अनेकांनी रेती तस्करीच्या व्यवसायात आपला जम बसविला आहे
स्थानिक प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यंत या तस्करांचे धागेदोरे असल्याने रेती तस्करी अवैद्य घाट निर्माण करून त्या घाटावरून उघडपणे रेती तस्करी केली जात आहे त्याच्यावर कारवाई करण्याची ताकद तालुका व जिल्हा प्रशासनात उरली नसल्याचे सध्या सुरू असलेल्या रेती तस्करी वरून दिसून येते त्यामुळे सामान्य नागरिकही चाललेल्या तस्करी कडे कानाडोळा करून पाठ फिरवत असतो त्यामुळे महसूल विभाग अवैद्य चाललेल्या रेती उपशाकडे गांभीर्य दाखवून त्यांच्यावर कारवाई करणार का का? असा सुर सर्वसामान्य जनतेच्या मुखातून प्रकट होत आहे…..( क्रमश ..पुढील भागात)