रिपब्लिकन पक्षच्या वतीने सम्राट अशोक यांची जयंती साजरी

185

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 30 मार्च :- मौर्य वंशाचे महान शासक सम्राट अशोक यांची जयंती बुधवारी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने साजरी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी – ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. रोहिदास राऊत यांच्या हस्ते सम्राट अशोकाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रि. प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, केशोराव सम्रुतवार, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, गडचिरोली शहर अध्यक्ष, अनिल बारसागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.नीता सहारे, ज्योती उंदिरवाडे, शहर महिला अध्यक्ष वनमाला झाडे, उपाध्यक्षा ज्योती चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून महान राजाला आदरांजली वाहिली. तसेच यावेळी बाबुराव गोवर्धन, जितेंद्र खंदारे, गणेश वाणीकर आदी उपस्थित होते.
सम्यक बुद्ध विहार – गोकुळनगर येथील सम्यक बुद्ध विहार येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री.तुलाराम राऊत होते तर रिपब्लिकन पक्षाचे प्रा.राजन बोरकर, श्री.जगन जांभुळकर, सुनील उराडे, लहुजी रामटेके, मोरेश्वर अंबाडे, श्री.चांदेकर, सेवानिवृत्त पीएसआय कु.सुमित्रा राऊत, अध्यक्षा सौ. व विशाखा महिला मंडळाच्या सचिव मनीषा वाळके, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती अरुणा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महान सम्राटांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना श्री.तुलाराम राऊत म्हणाले की, राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र, राष्ट्रचिन्ह, भारतरत्न पुरस्कार, भारताच्या राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल यांसारखी महान अशोकाची चिन्हे बौद्ध धर्म आणि सम्राट अशोकाची परंपरा दर्शवतात. यावरून सम्राट अशोक किती महान होता हे दिसून येते आणि प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे.
यावेळी भगवान भैसारे, मेघश्याम ढवळे, कु. चंद्रकला टेंभुर्णे, शशिकला सहारे, दमयंता सहारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, सम्यक समाज समिती, विशाखा महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.