लोकवृत्त न्यूज
ता.प्र / चामोर्शी, १४ मे : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोलू शर्मा (३०) गडचिरोली, महेश भोंगळे (२४) चामोर्शी, प्रफुल्ल येलुरे (२५), चामोर्शी, शुभम लांजेवार (२६) चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज वर काही मित्रमंडळी रविवार १४ मे रोजी पार्टी करण्याकरिता गेले असल्याचे कळते. दरम्यान त्यातील काहींना पाण्यात पोहण्याचा व आंघोळ करण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याची खोली न कळल्याने चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळविण्यात आली असून या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
( Lokvrutt news ) (Youth drowned in Wainganga River)