आबासाहेब काकडे बी फार्मसी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

0
170

 

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६ 

आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी.फार्मसी बोधेगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर या महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी आज जाहीर केला यामध्ये महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनुक्रमे प्रथम क्रमांक तांबडे विजय पांडुरंग ८०.७४ टक्के, द्वितीय क्रमांक गोरे सपना नामदेव ८०.३७ टक्के, तांबे पूजा अनिल ८०.३७ टक्के, तर तृतीय क्रमांक जोशी राघवी रामेश्वर ७९.६३ टक्के व मुंढे ऋतुजा तात्या ७९.६३ टक्के मिळवून महाविद्यालाच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रद्युम्न इगे यांनी सांगितले. यामध्ये प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असणाऱ्या सोयी सुविधा याबद्दल सांगताना आपल्या यशात महाविद्यालयाच्या अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक वृंद यांचा मोठा खारीचा वाटा असल्याचे सांगितले व त्यांचा पूर्ण वेळ हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध आहे. महाविद्यालयात प्रशस्थ इमारती सोबतच अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक सुविधांनी युक्त संगणक कक्ष तसेच मनमिळाऊ प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे असे नमूद केले. प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तसेच विद्यार्थी व पालकांचा वेळोवेळी पाठपुरावा यामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, नामांकित कंपन्यांमधील व्यक्तींचे मार्गदर्शन, नामांकित कंपनीस भेट, तसेच शैक्षणिक सहल, विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदशन कार्यक्रम, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, माजी विद्यार्थी मेळावा असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा स्वतःचा स्वतःमध्ये आत्मविश्वास उंचावला आहे.
संस्थेच्या वतीने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख ॲड डॉ. विद्याधरजी काकडे , जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंह (भैय्यासाहेब) काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिपक पाटील तसेच महाविद्यालयाचे समन्व्ययक संपतराव दसपुते यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here