लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ३१ मे :- २, ३, ४ जून रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला गडचिरोली येथील १६ कार्यकर्ते उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव एक कार्यकर्ता कमी झाल्याने आता एकूण १५ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे कार्यकर्ते कोल्हापुरसाठी रवाना झाले आहेत.
कोल्हापुरला रवाना झालेल्या या कार्यकर्त्यांत १० पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे , प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष चोपराम कांबळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह प्रशांत नैताम, विज्ञान बोध वाहिनी कार्यवाह उद्धव बांगरे, घोट शाखेच्या महिला प्रतिनिधी विजयश्री कांबळे, कार्याध्यक्ष आसिफ सय्यद, सदस्य मुमताज सय्यद, गडचिरोली शहर शाखेचे कार्याध्यक्ष उपेंद्र रोहनकर, प्रधान सचिव हरिदास कोटरंगे, महिला प्रतिनिधी अंजुम शेख, रजिया उसेंडी, प्रमिला कुमरे व चामोर्शी शाखेचे प्रधान सचिव शिवराम मोंगरकर आदी कोल्हापूर प्रवासासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. त्यांच्या या प्रवासाला गडचिरोली महाराष्ट्र अंनिसचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त देवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हा प्रधान सचिव प्रा विलास पारखी, कोषाध्यक्ष गोविंदराव ब्राह्मणवाडे, सुधाकर दुधबावरे, महिला प्रतिनिधी सुधा चौधरी , लहुजी रामटेके, दामोदर उप्परवार आदींनी शुभेच्छांचा दिल्या आहेत.