राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरीय तपासणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १ मे :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा) सन २०२१-२२ अंतर्गत गडचिरोली जिल्हयातून प्रथम क्रमांक मिळविलेली ग्रामपंचायत दिभना येथे दि.३१ मे २०२३ ला विभागस्तरीय समितीद्वारे तपासणी करण्यात आली. सदर समितीचे अध्यक्ष विवेक इलमे उपायुक्त (आस्थापणा) नागपूर विभाग, सचिव कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (विकास) नागपूर विभाग, छत्रपाल एस. पटले, विस्तार अधिकारी पंचायत विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर, रमेश वि. बागडे, सहायक संसोधन अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर हे होते.
सदर समिती द्वारे गावातील स्वच्छता विषयक बाबी, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापण, शाळा, अंगणवाडी संस्थात्मक सुविधा नाली व्यवस्थापण, गावातील पाणी गुणवत्ता विषयकबाबी, लोकसहभाग, नाविण्यपुर्ण उपक्रम इत्यादी विषयांची सखोल पडताळणी करण्यात आली. व समितीमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने दिभना गावातील नागरीकांचा, महिलांचा, युवक मंडळ तसेच स्थानीक पदाधिकारी, कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला. राहुल कुमार मीना भा.प्र.से., गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली, एफ.आर.कुत्तीरकर, प्रकल्प संचालक जलजिवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि.प. गडचिरोली, धनंजय साळवे, सहायक गट विकास अधिकारी, श्रीमती परसा मॅडम, गट शिक्षणाधिकारी, श्री.फरांडे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल भोयर वि.अ.पंचायत, पंचायत समिती, गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर तपासणी नियोजनात सरपंच श्री.रमेश गुरनुले , सचिव कु.वासंती देशमुख ग्रामपंचायत दिभना यांनी प्रमुख भुमीका बजावली तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार व तज्ञ, पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी, बि.आर.सी./सी.आर.सी, ग्रामपंचायत बोदली, शिवणी येथील सचिव, व स्थानिक नागरीक यांनी सहकार्य केले.