परदेशात शिक्षणासाठी लागणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता 8 जूनपर्यंत अर्ज

0
113

शिष्यवृत्तीकरीता 8 जूनपर्यंत अर्ज सादर करा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 2 जून :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येत असलेले अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणेबाबत अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३-२४ साठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक १६ मार्च, चे शासन निर्णयान्वये प्रस्तुत योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ६.०० लाख पर्यंत वाढविण्यात आले आहे.
उक्त योजनेचा अर्ज प्राचार्य, मुख्याध्यापक, शासकीय, अनुदानित, आश्रम शाळा तसेच एकलव्य, वसतिगृह व कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी ता.अहेरी जि. गडचिरोली मध्ये निशुल्क उपलब्ध आहे. सदर योजनेचा जास्तीत जास्ती लाभ घेण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज परिपूर्ण भरुन दिनांक ०८ जूनपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे सादर करण्यात यावा असे सहायक प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी अहेरी यांनी कळविले आहे.
या योजनेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवींचा समावेश आहे. एमबीए साठी 2 संख्या उपलब्ध असून यात पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पदवी 1 व 1 पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. बीटेक इंजिनीअरींग मधेही पदवी 1 व 1 पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. विज्ञान अभ्यासक्रमासाठी 1 पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. कृषि साठीही 1 पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. इतर विषयांमधे 2 पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. अशा प्रकारे 2 पदवी, 8 पदव्यूत्तर पदवी अशा 10 संख्येंचा समावेश आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज परिपूर्ण भरुन दिनांक 8 जूनपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे सादर करण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here