Lokvrutt news
गडचिरोली, ३ जून: मानव विकास मिशनअंतर्गत तालुका/ जिल्हा स्पेसिफीक योजनेच्या माध्यमातून ग्रामसंघांना TATA ACE या मालवाहू वाहनाचे वितरण २ जून रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील ८० टक्के लोक ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास असून येथील लोकांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सोबत बारमाही भाजीपालाचे उत्पादन काढण्यात येते. लोकांकडे वाहतुकीचे साधन नसल्यामुळे उत्पादित माल जवळच्या आठवडी बाजारात किंवा किरकोळ व्यापाऱ्याला अत्यंत कमी दरात विक्री करावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे उत्पादक कुटुंबाच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे. गडचिरोली तालुक्यातील दिव्यज्योती ग्रामसंघ जेप्रा व आरमोरी तालुक्यातील हिरकण्या ग्रामसंघ पिसेवडधा या ग्रामसंघामार्फत उत्पादित भाजीपाला व शेतमाल मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहचवीता यावे, जेणेकरून उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळेल व आर्थिक नुकसान सहन करावा लागणार नाही. याकरिता दोन्ही ग्रामसंघांना TATA ACE या मालवाहू वाहनाचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, तसेच जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामसंघातील महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.