कर्मयोगी आबासाहेबांनी शेतकरी, कष्टकरी, दलित व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले-भाऊसाहेब पोटभरे

0
183

 

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६

कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी आयुष्यभर शेतकरी,कष्टकरी, दलित व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले सर्व समाजाच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, समाजात परिवर्तन झाले पाहिजे, त्यांची प्रगती व्हायला हवी असे त्यांना नेहमी वाटत होते. मला आबासाहेबांच्या सानिध्यात जो अनुभव आला तो महत्त्वाचा आहे कर्मयोगी आबासाहेब माझे आदर्श दैवत असून त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न होते. आबासाहेब जन्माला आले ते परोपकारासाठीच. शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात सुधारणा झाली पाहिजे तरच समाज सुधारेल त्यासाठी मुळेचे पाणी लाडजळगावला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी त्यांनी संत गाडगेबाबा छात्रालय, वसतिगृहे व विद्यालये सुरू केली. उच्च शिक्षणाचे देखील त्यांचे स्वप्न होते ते देखील आज या महाविद्यालयाच्या स्वरूपात पूर्ण झालेले आहे. त्यांचे कार्य ॲड.डॉ. विद्याधरजी काकडे व सौ. हर्षदाताई काकडे पुढे चालवत आहेत असे प्रतिपादन सेवानिवृत्त कोपरगाव सहाय्यक आगार प्रमुख व राज्यस्तरीय अभिनेता पुरस्कार प्राप्त भाऊसाहेब पोटभरे यांनी केले. ते आबासाहेब काकडे कला विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय बोधेगाव येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.फसले हे होते.
कर्मयोगी आबासाहेब आणि स्वर्गीय निर्मलाताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयातील विज्ञान व बी. सी. ए. विभाग समन्वयक प्रा. डॉ. भागवत राशिनकर यांनी आबासाहेबांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. फसले यांनी अध्यक्षिय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक पवार यांनी केले, प्रास्ताविक जयंती पुण्यतिथी समिती प्रमुख प्रा. डॉ. गजानन लोंढे यांनी केले. तर प्रा. डॉ.भारत चव्हाण यांनी आभार मानले.या कार्यक्रमात भारत लांडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here