आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग २ च्‍या विकासकामांचे भूमिपूजन

0
165

लोकवृत्त न्यूज 
आरमोरी २७ जून : नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पालोरा व शास्त्रीनगर शेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवार (ता. २६) करण्यात आले.
विकासकामात पालोरा येथील दोन रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण, शास्त्रीनगरातील एका रस्त्याचे सिमेंटीकरण त्याचप्रमाणे प्रभाग १ मधील तीन रस्त्यांचे सिमेंट-काॅंक्रिटिकरण, प्रभाग ३ बाजारपेठ येथील रस्त्यांचे मजबुतीकरण व सिमेंटीकरण आदी कामे समाविष्ट करण्यात आले. पालोरा येथील खडीकरण कामाचे सोमवार (ता. २६) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आरमोरी नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती भारत बावनथडे, नगरसेवक मिथुन मडावी, कवळू धोटे, कृष्णा खरकाटे, नामदेव दर्वे, देवा धोटे, अशोक हारगुळे, प्रफुल्ल धोटे, विलास हारगुळे, खुशाल सोरते, रवींद्र टेकाम, बळीराम बुरांडे, अरुण ढोरे, डोनू हारगुळे, नरेश ढोरे, वैभव कुथे, कमलेश धोटे, सागर हारगुळे, पराग हारगुळे, टिंकू बोडे, अमोल खेडकर, चंदू मडावी, देवा वाघाडे, मंगेश भोयर, रवी निंबेकार, अमित जाऊजलकर, शंकर धकाते, अमित राठोड, संजय सोनटक्के, विक्की रोडगे, कैलास खोब्रागडे, पंकज चिलबुले व गावातील नागरिक उपस्‍थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here