लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २९ जून : आरमोरी विधानसभ क्षेत्रात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी बुधवार (ता. २८) जिल्हाधिकार्यांमार्फत् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांना नाहरकत प्रमाणपत्र देताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ५२ व ५३ मधील तरतुदी आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचन कार्यवाही करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. मात्र, असे असताना संबंधित नियमांना हरताळ फासून आरमोरी विधानसभा क्षेत्रात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून शासकीय जागेवर विनापरवानगी अनाधिकृत बांधकाम केले जात असल्याचा छगन शेडमाके यांचा आरोप आहे. यासाठी काही दलाल सक्रिय झाले असून १५ टक्के कमिशनसाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याची तक्रार शेडमाके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी आहे.