लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १३जानेवारी :- शनिवार ला त्यागमूर्ती अण्णाभाऊ साठे कला व सांस्कृतिक भवन येरवडा पुणे येथे युथ फॉउंडेशन पुणे यांनी गेल्या २५ वर्षांपासून उद्योजकता, महिला सक्षमीकरण, कला व कौशल्य, शिक्षण यावर कार्य करत आहे. यांच्याच तर्फे जागतिक उद्योजक व संस्कृती जतन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मलेशिया, ऑस्ट्रेलिया,जपान, भारतातील ओरिसा, छतीसगड, मध्यप्रदेश, तेलंगाणा, गडचिरोली, नंदुरबार, पालघर, नाशिक व इतर देशातून उद्योजक व संस्कृती जतन प्रदर्शित करण्याकरिता आलेले आदिवासी बंधू भगिनी यांनी आदिवासी संस्कृती जागतिक स्तरावर प्रदर्शित केले त्यामध्ये गडचिरोली जिह्यातून मिस इंडिया मनीषा मडावी यांच्या मार्गदर्शन खाली गेलेले सज्ज मडावी, कु.जयश्री करगामी, राजकुमार उईके भंडारा , पियुष करगामी,जानवी ऊईके, मोनिका नरोटे, जगदीश मडावी,अनुप माझी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आदिवासी हे प्रकृती पूजक असून जल,जंगल, जमीन यांचे रक्षण करणारा आहे. नैसर्गिक संसाधन व उपयोजन प्राकृतिक पद्धतीने करत असून त्याचा विल्हेवाट सुद्धा निसर्गाला हानी होणार नाही,इतर प्राणी जसे निसर्गनियम पाळून जगतात त्याच प्रमाणे आदिवासी संस्कृती आहे. आणि आदिवासी समुदाय जगत आहे. पण इतर समुदाय, आदिवासी समुदाय कडून प्रेरणा घेऊन प्रकृती चे संवर्धन व रक्षण करावे यावर प्रदर्शन सादर करत सर्वांचे मन जिंकले गडचिरोली जिल्याचे नाव जागतिक स्तरावर कोरले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा सह महाराष्ट्र मधून गडचिरोली युवकांचे अभिनंदन व शुभेच्छा चे वर्षाव होत आहे.