संजय दैने गडचिरोली जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी

309

संजय मीणा यांची तडकाफडकी बदली झाली असून आता संजय दैने हे नवे जिल्हाधिकारी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 11 मार्च:- संजय दैने हे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ऑगस्ट २०२१ मध्ये संजय मीणा गडचिरोलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या मात्र संजय मीणा यांची बदली झाली नव्हती त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहतील अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती परंतु सोमवार ११ मार्च रोजी अचानकच त्यांच्या बदलीचे आदेश धडकले आहे. तर जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी अशी मागणीही काही संघटनांनी केली होती. आता नवे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांची नेमणूक करण्यात आल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याचे तसेच जिल्ह्यातील इतरही समस्यांचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहेत.