उद्यापासून जलजागृती सप्ताह

74

उद्यापासून जलजागृती सप्ताह

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १५ : दरवर्षी २२ मार्च हा दिवस “जागतिक जलदिन” म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून जलसंपदा विभाग मार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्च हा सप्ताह “जल जागृती सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे

पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन, जलप्रदुषण, पाण्याची गुणवत्ता राखणे या विषयी जनजागृती करण्यासाठी”वाटर फोर पीस” या संकल्पनेवर जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये जल प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेषतः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा स्तरावर ७५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत जलप्रतिज्ञा कार्यक्रम पोहचविण्याचे नियोजित आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १६ मार्च रोजी गडचिरोली पाटबंधारे विभाग येथे सकाळी १० वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोडी यांचे हस्ते तसेच जिल्ह्यातील अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे.