शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणाया दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा ठोठावण्यात आली
गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, आशुतोष नि. करमरकर यांचा न्यायनिर्णय
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 1 एप्रिल:- सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी – मपोउपनि. सोनम नाईक हे आपले हद्दीतील मपोउपनि. सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी दिनांक 27/10/2021 रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलींग करीत असतांना गांधीवार्ड देसाईगंज येथील आरोपी 1) रजनी रामचंद्र आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज ही तीचे राहते घरी अवैधरीत्या देशी विदेशी दारुची विक्री करते अशी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन, पंचांसमक्ष आरोपी नामे रजनी आत्राम यांचे घराची झ्डती घेत असतांना आरोपी 2) शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे रा. गांधीवार्ड, देसाईगंज हिने माझ्या आईला दोन मुली पोसायचे आहेत म्हणुन माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलीस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी फिर्यादीचे अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेली मपोउपनि. सुजाता भोपळे यांचे दोन्ही हात पकडुन खाली ढकलुन दिले. तेव्हा पोलीस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आरोपी क्र. 1 व आरोपी क्र. 2 यांनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.
असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिनांक 27/10/2021 रोजी अप क्र. 579/2021 अन्वये कलम 353,332,504,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीस दिनांक 28/10/2021 रोजी 14.02 वा अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 38/2022 नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवून, फिर्यादी पंच व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 01/04/2024 रोजी आरोपी 1) रजनी आत्राम, वय 47 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज व 2) शितल रामचंद्र आत्राम, वय 26 वर्षे, रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली या दोघींना मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 353, 34 भादवी मध्ये दोषी ठरवून 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि. राजेश गावडे पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबंधीत साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले.