उद्या केरोडा येथे रोग निदान व उपचार शिबीर

0
663

-जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ व ग्रा. पं.केरोडाचा पुढाकार

लोकवृत्त न्यूज
सावली २९ एप्रिल : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ व ग्रा. पं.केरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत जिल्हा परिषद शाळा केरोडा येथे रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसील हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखडयाचे आजार, पोटाचे आजार, गलगंड, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, संधिवात, माणक्यात गॅप, कंबरेचे दुखणे, मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, गाठी, महिलांचे आजार, हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मृतांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण ल, लहान मुलांचे सर्व आजार यांची तपासणी व उपचार केल्या जाणार आहे.
या शिबिरात शिबीर स्थळी नोंदणी मोफत, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत, भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या, खाट, शुल्क, जेवण मोफत, अतिविशिस्ट चाचण्या आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ५० टक्के सवलतीच्या दरात, रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार विनामूल्य होणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्याकरिता आयोजकांनी आवाहन केले आहे. तसेच शिबिरामध्ये येतांना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे असेही सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here