- -सात विद्यार्थी ठरले पात्र
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी शैक्षणिक सत्र २०२३ -२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून एकूण ७ विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.
पात्र विद्यार्थ्यांमध्ये लकी पितांबर बारसागडे, राज मनोज कोटगले घनप्रिय भूषण नैताम, एहफाज हमीद शेख, उन्नती महादेव पुरी, एंजल विलास शेंडे हे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले आहेत. तर तारका रंजन रामटेके ही विद्यार्थिनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेली आहे. शाळेतील मार्गदर्शक शिक्षक तथा मुख्याध्यापक मंगला रामटेके, संध्या चिलमवार, अनिल खेकारे, संदीप मेश्राम यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे प्रयत्न यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आरुषी रतन सहारे (अनुसूचित जात गट जिल्हा मेरिट्स क्रमांक 6 ) ही विद्यार्थिनी N M M S च्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेली आहे. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उप मुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, केंद्रप्रमुख सुधीर गोहणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वर्हाडी, सदस्य खलीप घुटके, सुनिता रामटेके, सखाराम खोब्रागडे, वैशाली पिंपळशेंडे, शाळेच्या शिक्षिका कविता खोबरागडे, रेखा बोभाटे, सुजाता शेंडे, वंदना मडावी, कपिल देव मशाखेत्री, ओम पुराम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.