गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

0
335

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमुन तळ ठोकून आहेत. सदर गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या आदेशाने माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आली.   गुरुवारी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की, कसनसूर – चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर दलम आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे मौजा भिमनखोजी, नारकसा (पोस्टे गॅरापत्ती पासून 04 किमी उत्तरेला)

यावरून अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ 113 बटा. अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. मौजा भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे 15.00 वा. चे दरम्यान माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असतांना पोलीस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडुन पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला.

माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन 👇

इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here