७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे सातबारा साठी भूमिअभिलेख कार्यालयाच्या चकरा

0
283

– त्रस्त शेतकरी करणार उपोषण

खासदार आमदार यांच्या पत्राची अधिकारी दखलच घेत नाही

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली येथील जुना सर्वे नंबर ५४८/२,५४९/२ (०.६०) हेक्टर आर ही शेती मी १९९५ साली घेतलेली आहे, फेरफार क्रमांक ९१२,९१३ असून माझ्या शेतीवर मला न विचारता व मला साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनरमोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर ५१३/१ (०.३६) व ५२८/१ (०.२४) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे मला सातबारा दुरुस्ती करिता अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत त्या कारणाने मी नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती पीडित शेतकऱ्याने दिलेल्या आपल्या उपोषणाच्या पत्रात नमूद केली आहे व दप्तर दिरंगाई च्या कायद्यानुसार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी २४ जून पासून उपोषण करणार आहे.

सातबारा दुरुस्ती प्रकरणी सुनावणी
¶¶¶
सदर प्रकरणी २ नोव्हेंबर २०२३ ला उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आलेली आहे. सुनावणीस भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक यांचेसह,वरिष्ठ लिपिक व ३ भुकर मापक,यांचेसह उपविभागीय अधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी,नायब तहसिलदार तसेच दुरुस्ती लिपिक यांचे सह गडचिरोलीतील तलाठी सुद्धा हजर होते.यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करून ८ दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले होते.

७५ वर्षीय शेतकऱ्याने सातबारा दुरुस्तीसाठी जोडलेली कागदपत्रे
¶¶¶
सातबारा दुरुस्ती बाबत मुळ अर्ज, जुना सातबारा नंबर ५४८/२ व ५४९/२, शेती घेतली त्याचे खरेदी पत्र १९९५ ची,फेरफार नंबर,९१२,९१३ रि नंबरिंग परचा,पी-वन,पी-नाइन, बंदोबस्त मिसाल, नकाशा, विलंब माफी अर्ज,सर्व लगत धारकांचे सातबारा व मोजणी केलेली क सीट सर्व दस्तऐवज जोडून अर्ज सादर केला आहे.

खासदार, आमदार यांच्या पत्राकडे अधिकारी करतात जाणीवपूर्वक दुर्लक्ष
¶¶¶
सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी २ पत्र कार्यालयाला पाठवले त्याचप्रमाणे आमदार डॉ.देवराव होळी यांनी शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३ पत्र दिले पण अधिकारी त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे दिसून आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालय यांच्यात ताळमेळ चा अभाव
¶¶¶
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली तथा तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली यांच्याकडून शेतकऱ्यांची दुरुस्तीची प्रकरणे उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवली जातात पण त्याकडे या कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याच्या कारणाने त्या कार्यालयातील कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालयातून आलेल्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात व अनेक शेतकऱ्यांची दुरुस्ती ची प्रकरणे दोन-दोन,पाच-पाच वर्ष अशी प्रकरण निकाली निघत नाही.

आनंदराव गणुजी कांबळे वय ७५ वर्ष
शेतकरी
¶¶¶
सातबारा दुरुस्ती च्या नावाखाली होणाऱ्या विलंबास जबाबदार कोण ? व माझ्या नावे नवीन सातबारा केव्हा तयार करुन देणार ? या मागणीसाठी त्रस्त वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे (वय ७५) रा. गडचिरोली हे नाइलाजास्तव २४ जून २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती उपोषणाच्या पत्रातून दिली आहे.

तसेच जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम राहणार आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदर गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले असून ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला केवळ सातबारा साठी उपोषणाला बसावे लागत असल्याची वेळ आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा साठी वृद्ध शेतकरी उपोषणाला बसणार असल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्यही लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here