पोलीस शिपायाचा कारनामा : प्रेमात ओढून लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवून लाखो रूपयांची केली मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : पोलीस हे जनतेचे रक्षण म्हणून पाहिले जाते मात्र रक्षकच आता भक्षक बनलेले दिसून येत आहे. घातले असे की एका पोलीस शिपायाने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करत व्हिडीओ बनविला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत सव्वातीन लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पद्माकर भगवान भोजने (38 वर्ष) असे त्या शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहेत
पद्माकर भोजने हा विवाहित असताना आपण पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगून त्या तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासनही दिले व त्या तरुणीसोबत प्रेमसंबंध तयार करून तिचे लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. त्याने तिला दीड लाखाचे दागिने आणि रोख सव्वातीन लाख रूपयांची मागणी केली. या प्रकाराने भांबावलेल्या त्या तरुणीने अखेर गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. त्यामुळे त्या शिपायावर बलात्कारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे.